MAEER's MIT GROUP OF INSTITUTIONS, PUNE (INDIA)

शाळा

 • परिचय
 • प्रवेश प्रक्रिया
 • ठळक वैशिष्ट्ये
 • संपर्क
मुकूंदराज उच्च माध्यमिक विदयालय, नांदगाव, लातूर, (महाराष्ट्र), भारत

परिचय

मुकूंदराज उच्च माध्यमिक शाळा, नांदगाव, या शाळेला महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळाली असून मराठी माध्यमिक विदयालयामध्ये इयत्ता ११ वी ते इयत्ता १२ वी पर्यंत कला शाखेचे शिक्षण दिले जाते. या महाविदयालयाची स्थापना दिनांक २२ जून, २००४ रोजी झाली. अल्प कालावधीमधे १०० पेक्षा जास्त विदयार्थी या शाखेत शिकत आहेत.

ही शाळा ता. नांदगाव जि. लातूर येथे वसलेली आहे. शाळा काढण्यामागचा हेतू म्हणजे विदयार्थ्याना सेवा करण्याची, नेतृत्व करण्याची आणि संभाव्य सर्व क्षेत्रातील प्राधान्य मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी उत्तम दर्जाचे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी या संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात ते प्रसार माध्यमे, चित्रपट आणि दूरदर्शन, पत्रकारिता या मध्ये त्यांचे क्षेत्र निवडू शकतात किंवा लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धात्मक नागरी सेवा परीक्षेसाठी देखील प्रयत्न करू शकतात.

प्राचार्याचे नाव

principle details

श्री. सानप नागनाथ बंसीधर

 • +९१ २३ ८२ -२२७ ८०९, +९१९४२२४७२६०३
 • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

नांदगाव कॅम्पस

 • निवासी /अनिवासी शाळा :फक्त निवासी शाळा

प्रवेश प्रक्रिया

इयत्ता वय निकष आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया फी
अकरावी कला - टी.सी., गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर) मॅन्युअल प्रक्रिया १,०००/-
बारावी कला - टी.सी., गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर) मॅन्युअल प्रक्रिया १,३००/-

ठळक वैशिष्ट्ये

 • खरे पाहता उच्च शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी या भाषेला अनन्य साधारण महत्व आहे. त्यासाठी आम्ही जूनियर कॉलेजमध्ये इंग्रजीला दुसरी भाषा म्हणून प्राधान्य दिलेले आहे.
 • अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षावरच आधारीत असतो.
 • फक्त पात्र त्याचबरोबर लक्षणीय प्राविण्य आणि विषयांवर प्रभुत्व असणारे शिक्षक नेमले जातात.
 • व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण शिबिर, अभ्यास दौरे, शैक्षणिक उत्कृष्टता आणि इतर विद्यार्थ्यांसाठी केंद्रीत सक्रिय विशेष प्रशिक्षण नियमितपणे घेण्यात येतात.
 • नैसर्गिक प्रतिभांनुसार आणि अभिरुचीनुसार विद्यार्थी शिक्षणाच्या विविध गटामध्ये त्यांच्या प्रतिभामुळे सहभागी होऊ शकतात. विविध हितसंबंधीत गटामध्ये विद्यार्थी आपल्या आवडीनुसार जसे परिचर्चा समूह, संगीत समूह, नृत्य समूह, वक्तृत्व समूह, सामान्य ज्ञान समूह, संगीत समूह, साहित्य समूह, गणित समूह, निसर्ग समूह इ. मध्ये सामील होता येते.
 • नैतिक प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते त्यामध्ये जात किंवा धर्म हा भेदभाव बाळगला जात नाही. त्यामुळे देशावर प्रेम करणारी आणि योग्य मार्गांनी जाणारी पिढी तयार होण्यास मदत होईल
 • शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांमधील चांगले मूल्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून शिक्षणाला हातभार लागेल आणि मनापासून नैतिक प्रामाणिकपणा आणि बौद्धिक कृत्ये त्याचबरोबर उमेदिने हाताळणी उंचावून त्याचा सराव चालू ठेवला जातो.
 • शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिगत समस्या आणि समुपदेशन कुशलची मदत आणि काळजी घेतात
 • जूनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कायापालट करणारा घटक असल्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या कामगिरीची माहिती वेळेवर दिली जाते.
 • पालकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात.
 • विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतेवेळी संगणक वापर आणि इतर दृकश्राव्य साधने सोबत असतात
 • आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्मार्ट वर्ग, दृकश्राव्य साधने आणि एल.सी.डी प्रदर्शक पुरवले जाते.
 • सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि त्याचबरोबर इंटरनेटचा वापर या सुविधा विद्यार्थ्यांना पुरवली जाते
 • प्रशस्त ग्रंथालयामधील पुस्तके,नियतकालीके आणि सीडीचे संग्रह विद्यार्थ्यांना पुरविले जाते..
 • संस्थेतील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रतिबद्ध असते म्हणून त्यांना अभ्यासोत्तर उपक्रमांवर भर देण्याचा प्रयत्न केला जातो.
 • विशेष कार्यशाळा आणि करियर मार्गदर्शन व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या करियरचा योग्य मार्ग निवडू शकतात.

संपर्क

 • मुकूंदराज उच्च माध्यमिक विदयालय, नांदगाव, लातूर, (महाराष्ट्र), भारत
  पत्ता: पोस्ट. ता. नांदगाव,
  जि. लातूर - ४१३ ५१२.
 • +९१ ०२३८२-२२७८०९
 • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.